भाजप प्रवेश देणे आहे ; भ्रष्टाचाराचा अनुभव असणाऱ्यांना पहिली पसंती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/BJP.jpg)
पुणे – पुण्यात पोस्टर लावत भाजप प्रवेशाची खिल्ली उडविण्यात आली आहे. अनोळखी व्यक्तीकडून हे पोस्टर लावण्यात आले असून नोकरीची जाहिरात असल्याप्रमाणे भाजप प्रवेश देणे आहे, असा उल्लेख या पोस्टरवर करण्यात आला आहे. हे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
भाजप आणि शिवसेना पक्षात सध्या जोरदार इनकमिंग सुरु आहे. यावरून या पोस्टरमधून खिल्ली उडविण्यात आली आहे. यात नियम व अटीही देण्यात आल्या आहेत. ईडी व इन्कम टॅक्स नोटीस आलेल्यांना प्राधान्य, भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती आणि सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव अशा प्रमुख अटी देण्यात आल्या आहेत.
या पोस्टरमध्ये तळटीपही देण्यात आली आहे. विचारधारेची कुठलीही अट नाही, असा उल्लेख करून आमच्याकडी जागा फुल झाल्यास मित्रशाखेत अॅडजस्ट करता येईल, असा खोचक टोलाही लगावला आहे. कारण भाजपसोबत शिवसेनेतही काही नेत्यांनी प्रवेश केले आहेत.