Uncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
बोगस एफडीआर आणि बँक गँरंटीप्रकरणी महापालिका ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
![Case should be file against 18 Fake contractor in PCMC](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/case-should-be-file-against-18-Fake-contractor-PCMC-1.jpeg)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांमध्ये बोगस एफडीआर आणि बोगस बँक गँरंटी आढळून आली आहे. याबाबत सदर 18 ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावे, अशी मागणी कैलास बारणे यांनी केली आहे. त्यासंदर्भातील पत्र गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आले आहे.
महापालिकेच्या विविध विकासकामांसाठी निविदा भरताना ठेकेदारांना सुरक्षित रक्कम (एफडीआर) आणि बँक हमी देणे बंधनकारक असते. मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेतील 18 ठेकेदारांकडील एफडीआर व बँक हमी हे बोगस आढळून आले आहे. सदर ठेकेदारांना तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले. मात्र त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला नाही. महापालिकेतील शहर अभियंता आणि स्थापत्याचे कार्यकारी अभियंत्यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार देत एकमेकांकडे बोट दाखवून एकप्रकारे ठेकेदारांना पाठबळच दिले आहे, असा आरोप बारणे यांनी केला.