फळभाज्यांच्या ठसेकामातून शरद पवारांबद्दल कृतज्ञता, अपंगांची कलाकृती
![Sharad Pawar artwork by handicapped student in Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Sharad-Pawar-artwork-by-handicapped-student-in-Mumbai.jpg)
देशभर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे लाखो चाहते आहेत. युवकवर्गातही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप आहे. अनेकजण पवारांच्याप्रती आपल्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत असतात. याचप्रकारे मुंबईतील कुलाबा येथील सेंट अँस गर्ल्स स्कुलमधील मुलांनी शरद पवारांबद्दल आपले प्रेम अनोख्या शैलीत व्यक्त केले आहे.
मुंबईतील कुलाबा येथील सेंट अँस गर्ल्स स्कुलमधील शबनम अन्सारी, आकांक्षा वाकडे, अभिषेक मोवाडे, मनश्री सोमण, सिया पारकर, अपूर्वा राणे या दिव्यांग मुलांनी फळभाज्यांचे ठसेकाम करून शरद पवार यांचे खास चित्र साकारले आहे.
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी याविषयी ट्विट करत माहिती दिली. त्यांनी या मुलांनी साकारलेली कलाकृतीचे फोटो शेयर केले आहेत.
याआधी उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील युवकाने शेतात बियांची पेरणी करुन शरद पवारांची कलाकृती निर्माण केली होती. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील एका भिंतीवर पवारांचे पावसातील सभेचे चित्र साकारण्यात आल्याचे आपण पाहिले