Uncategorized

प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ध्वजारोहण

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

देशाच्या प्रजसत्ताक दिनाचे औचित्य साधत उद्यान परिवार आणि ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुजरनगर येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानात ध्वजारोहण करण्यात आले.

परिसरातील शेकडो नागरिक यानिमित्ताने एकत्र आले. नगरसेवक सचीन भोसले यांच्या शुभहस्ते ध्वजावंदन करण्यात आले. यावेळी स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आदिनाथ लोहार, पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष आनिल वडघुले, शेकाप कार्याध्यक्ष हरिष मोरे, उद्यान परिवाराचे ज्येष्ठ सदस्य विष्णू तांदळे, सूनिल कोलते, सूभाष साळुंखे, बाळासाहेब भानगिरे, संजय मातेरे, योग संस्थेच्या शानू शुक्ला, नायडु आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य व योग संस्थेच्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

लक्ष्मीबाई उद्यानमध्ये रोज सकाळी अनेक ज्येष्ठ मंडळी व्यायामासाठी तसेच योगा करण्यासाठी येत असतात. त्यांनी एकत्र येऊन उद्यानामध्ये उद्यान परिवार हा ग्रुप तयार केला आहे. यामध्ये सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शिक्षक, डॉक्टर अशा विविध क्षेत्रातील मंडळी या उद्यान परिवाराचा भाग आहेत. वर्षभर उद्यानामध्ये प्रजसत्ताक दिनासारखे विविध उपक्रम राबवले जातात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button