पीएम किसान सन्मान निधी, रजिस्ट्रेशन न करताच खात्यात पैसे
![PM Kisan Sanman Nidhi suspicious activity](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/PM-Kisan-Sanman-Nidhi-suspicious-activity.jpg)
गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये हे तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. मात्र या योजनेमध्ये त्रुटी असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी अपात्र लोकांच्या खात्यात पैसे जमा होतात. आता तर ज्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली नाही, अशा लोकांच्या खात्यातही या योजनेचे पैसे जमा होत असल्याचे समोर आले आहे.
मनी कंट्रोलमध्ये याबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत UIDAI आणि TRAI चे माजी प्रमुख असलेल्या रामसेवक शर्मा यांच्या बँक खात्यामध्ये यावर्षी पीएम किसान सन्मान योजनेमधून तीन हप्त्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत. मात्र शर्मा यांनी या योजनेसाठी आपल्या नावाची नोंदणी केली नव्हती. मी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठेही नोंदणी केलेली नव्हती. तरीही माझ्या नावाची नोंद झाली आहे. याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकाने ओळख न पटवता खाते पात्र कसे ठरवले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
वाचाः फडणवीस दिल्लीत जावेत ही मुनगंटीवारांची इच्छा – उद्धव ठाकरे; वाचा काय म्हणाले
शर्मा यांनी सांगितले की, पीएन किसान सन्मान निधी योजनेंतर्गत माझ्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये तीन वेळा पाठवण्यात आले. शर्मा यांच्या नावाने हे खाते ८ जानेवारी रोजी उघडण्यात आल होते. तसेच ते सुमारे नऊ महिने अॅक्टिव्ह होते. अखेर २४ सप्टेंबर रोजी हे खाते डिअॅक्टिव्हेट झाले. उत्तर प्रदेशमधील फिरोझाबाद जिल्ह्यात एक शेतकरी म्हणून माझे नाव रजिस्टर झाले होते. दरम्यान, याची माहिती मिळाल्यानंतर मी याबाबत बँकेला कळवले आहे. मात्र त्याचे अद्याप उत्तर मिळालेले नाही. मी या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहे कारण मी प्राप्तिकर भरतो, असे त्यांनी सांगितले.
अभिनेता भगवान हनुमान, आयएसआय गुप्तहेर महबूब अख्तर आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या नावानेसुद्धा पीएम किसान योजनेची खाती बनली आहेत. त्यांची आधारकार्ड उपलब्ध आहेत. हनुमानच्या खात्यात सहा हजार, महबूब अख्तरच्या खात्यात चार हजार तर रितेश देशमुखच्या खात्यात या योजनेचे दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.