Uncategorized

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन, कुस्ती क्षेत्रावर शोककळा

कोल्हापूर – पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी महाराष्ट्र केसरी, ऑल इंडिया चॅम्पियनसारख्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. हिंदकेसरी जिंकत कुस्ती क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळवत महाराष्ट्राची मान त्यांनी उंचावली होती. खंचनाळे यांचं राज्यातील अनेक मल्ल घडवण्यात मोठं योगदान आहे. त्यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

वाचा :-आजच्या हिवाळी अधिवेशनात ६ अध्यादेश, १० विधेयके मांडणार

खंचनाळे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, कुस्ती ही लढवय्या महाराष्ट्राची शान आहे. मातीतल्या या खेळावर महाराष्ट्राचे नाव कोरले ते पहिला हिंदकेसरी किताब पटकावून श्रीपती खंचनाळे यांनी. त्यांच्या निधनामुळे अनेक हिंदकेसरींचे आणि होतकरू कुस्तीगीर पैलवानांचे वस्ताद म्हणजे मार्गदर्शक छत्र हरपले आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदकेसरी ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांना वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, कुस्ती ही महाराष्ट्राची शान आणि मान आहे. महाराष्ट्राने कुस्तीला लोकाश्रय आणि राजाश्रय दिला. या कुस्तीवर महाराष्ट्राचे नाव कोरण्याची किमया ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांनी केली. देशातला पहिला हिंदकेसरी किताब पटकावून त्यांनी महाराष्ट्राचा आणि कुस्तीचा गौरव उंचावणारी कामगिरी केली. ते आयुष्यभर कुस्तीत येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहीले. अनेक हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी यांच्यासह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीत नाव कमावलेल्या पैलवानांचे ते वस्ताद ठरले. काळानुसार या खेळातील बदलांकडेही त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले. त्यांना क्रिडाक्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील क्रिडा क्षेत्रातील आणि विशेषतः कुस्तीच्या क्षेत्रातील मार्गदर्शक असे छत्र हरपले आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button