Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून होणार सुरु
मुंबई |
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. विशेष म्हणजे हे अधिवेशन केवळ दोनच दिवस चालणार आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी करुन तो दोन दिवस इतका करण्यात आलेला आहे.
आजपासून सुरु होत असलेल्या अधिवेशनात सरकार विरुद्ध विरोधक असासामना रंगण्याची चिन्हे आहेत. कारण, मराठा आरक्षण, कोरोना ते शेतकरी यांसह इतरही विविध मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.





