‘त्यांनी’ थेट राज्यमंत्र्यांनाच फोटो काढायला सांगितला, आणि चक्क…
![Rajyamantri Bharane clicks photo on demand](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Rajyamantri-Bharane-clicks-photo-on-demand-1.jpg)
मुंबई : कालपासून राज्य विधीमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, सत्ताधारी-विरोधी पक्षांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे हा दिवस गाजला. मात्र या अधिवेशानाच्या पहिल्या दिवसानंतर एक वेगळीच घटना विधानसभा भवनापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मरीन ड्राइव्हवर घडली.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे मरिन ड्राइव्हवर वॉकसाठी गेले असता, काही तरूणांनी त्यांना त्यांचा फोटो काढण्याची विनंती केली. विशेष म्हणजे भरणे यांनी देखील कोणतेही आढेवेडे न घेता तरुणांचे फोटो काढले. दत्तात्रय भरणे मरीन ड्राईव्हवर इव्हनिंग वॅाक करण्यासाठी बाहेर पडले होते. यावेळी गप्पा मारत बसलेल्या तरूणांनी थेट “ओ काका आमचा एक फोटो काढा की,” असे म्हणत, थेट दत्तात्रय भरणे यांना फोटो काढण्याची विनंती केली. यानंतर तरुणांच्या विनंतीनंतर भरणे यांनी देखील तरूणांचे फोटो काढले.
त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे की, आज विधिमंडळाचे कामकाज आटपून सायंकाळच्या वेळी मरीन ड्राईव्ह ला फेरफटका मारत होतो. अचानक मला मुलांनी आवाज दिला आणि आमचा सर्व मित्रांचा एक फोटो काढा अशी विनंती केली. मला सहज माझे तरुण असतानाचे मित्रांच्या सोबतचे दिवस आठवले. मी त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांचे फोटो, त्यांच्या जीवनातील अनमोल क्षण कैद केले. अचानक माझा फोटो आ. आशुतोष काळे यांनी काढला. त्या नंतर मुलांना समजले की आपण महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांना सांगितले होते. त्या त्यांनी सोबत एक फोटो आपण पण काढुया अशी विनंती केली. त्यांच्या आनंदात मला सहभागी होता आले याचा मनापासून आनंद वाटला.
तरूणांना अखेर दत्तात्रय भरणे हे कोण आहेत हे समजल्यानंतर त्यांच्यासोबत देखील फोटो काढण्याची विनंती केली. भरणे यांनी हा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे