Breaking-newsUncategorizedराष्ट्रिय
तिरंगा खाली खेचल्यावरून कॉंग्रेसचे अमित शहांना खडे बोल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/rahul-gandhi-amit-shah1-696x365.jpg)
नवीदिल्ली: भाजपा मुख्यालयामध्ये ध्वजारोहण करताना अमित शहा यांच्या कडून चुकून राष्ट्रध्वज खालच्या बाजूस खेचला गेल्याचा एक व्हिडीओ काँग्रेसने ट्विट केला आहे. या व्हिडीओ मध्ये भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या हातून ध्वजारोहण करताना चुकून तिरंगा खालच्या बाजूस खेचला गेला आहे. याबाबत ट्विट करताना काँग्रेसने ‘यांच्याकडून तिरंगा सांभाळला जात नाही, हे देश काय सांभाळणार?’ अशा आशयाचे ट्विट करण्यात आले आहे.