Uncategorized

जर्मनीची ज्युलिया जॉर्जेस टेनिसमधून निवृत्त

जर्मनीची महिला टेनिसपटू 31 वर्षीय ज्युलिया जॉर्जेसने आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली आहे. 2018 साली जॉर्जेसने विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत ज्युलिया जॉर्जेस 45 व्या स्थानावर आहे. डब्ल्यूटीए टूरवरील महिलांच्या टेनिस स्पर्धामध्ये जॉर्जेसने आतापर्यंत एकेरीची सात तर दुहेरीची पाच अजिंक्यपदे मिळविली आहेत. नुकत्याच झालेल्या प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत जॉर्जेसने आपला शेवटचा सामना खेळला होता. तिला या स्पर्धेत दुसऱया फेरीत हार पत्करावी लागली होती. दोन वर्षांपूर्वी डब्ल्युटीए टूरवरील मानांकन यादीत जॉर्जेसने नवव्या स्थानापर्यंत झेप घेतली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button