जगातील सर्वात मोठी चिनी ऍप टॅक्सी सेवा बंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/china-national-flag-1-1.png)
बीजिंग (चीन) – जगातील सर्वात मोठी चिनी ऍप टॅक्सी सेवा बंद करण्यात आली आहे. ही सेवा देणाऱ्या दीदी चूसिंग कंपनीने ही ऍप टॅक्सी सेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
शुक्रवारी या कंपनीच्या एका टॅक्सीच्या चालकाने 20 वर्षीय महिला प्रवाशावर बलात्कार करून तिची हत्या केली होती. संबधित ड्रायव्हरला अटक केली आहे. त्यापूर्वी मे महिन्यातही ऍप सेवा कंपनीच्या एका टॅक्सीने प्रवास करणाऱ्या 21 वर्षीय एयर होस्टेसवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. तेव्हाही हे कृत्य टॅक्सीच्या ड्रायव्हरने केलेले होते.
पहिल्या प्रसंगानंतर ऍप टॅक्सी सेवा कंपनी काही काळ बंद ठेवण्यात आली होती. आणि नंतर नावात बदल करून पुन्हा सेवा चालू करण्यात आली होती. 3 अब्जपेक्षाही अधिक प्रवाशांना सेवा देण्याचा विक्रम नावावर असलेली कंपनी तीन महिन्यात झालेल्या या दुसऱ्या घटनेनंतर आता पुन्हा बंद करण्यात आली आहे.
ऍप कंपनीने उपाध्यक्ष (ग्राहक सेवा) हुआंग जिन्हांग आणि ऑनलाईन महाव्यवस्थापक हुआंग जिली यांना निलंबित केले आहे. प्रसिद्ध चिनी अभिनेता वांग चुंजून याने दीदी चूसिंगची ऍप सेवा बंद करण्याबाबत विबो सोशल मीडियावर ट्विट केले हाते. ते सुमारे 58 हजार जणांनी शेयर केले आणि सुमारे 90 लाख लोकांनी पाहिले.