breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमनोरंजनराजकारण

‘घरच्यांना माहित असतं आपल्या माणसांसाठी काय चांगलं आहे’ पंकजा रोहित यांच्यात टोलवाटोलवी; चला हवा येऊ द्या !

चला हवा येऊ द्या’मध्ये यंदा राजकीय वारे वाहणार आहेत. कारण थुकरटवाडीत भाजपा नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि भाजपा खासदार सुजय विखे यांनी हजेरी लावली आहे. राजकीय मैदानात एकमेकांच्या विरोधात डावपेच आखणारे दोन दिग्गज कुटुंब एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत. चला हवा येऊ द्याच्या मंचावर धमाकेदार राजकीय फटाकेबाजी पाहायला मिळणार आहे.

पंकजा मुंडेंचा रोहित पवारांना टोला

कार्यक्रमात पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे आणि सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे सहभागी झाल्या होत्या. या सहभागी झालेल्या जोडप्यांमध्ये एक खेळ खेळण्यात आला. रिंग टाकून वस्तू जिंकण्याचा हा खेळ होता. गंमतीशीर बाब म्हणजे त्या वस्तूंमध्ये घड्याळाचाही समावेश होता. योगायोगाने धनश्री आणि अमित यांनी रिंग टाकली आणि नेमकी ती घडाळ्यावर पडली. त्यानंतर “तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना नका हो फोडू”, असा टोला पंकजा मुंडेंनी रोहित पवारांना लगावला.

रोहित यांचे मजेशीर प्रत्युत्तर

“सुजय यांची बायको आणि माझा नवरा यांना फोडण्याचं काम रोहित करत आहेत”, असा मिश्किल टोमणा पंकजांनी मारताच रोहित पवारांनीही त्याला मजेशीर प्रत्युत्तर दिलं. “घरच्यांना माहित असतं आपल्या माणसांसाठी काय चांगलं आहे”, असं रोहित म्हणताच सेटवर एकच हशा पिकला.

पाहाः #VIRALVIDEO: जिंदगी ना मिलेगी दुबारा; वयस्कर आजीआजोबांचा डान्स व्हिडिओ व्हायरल

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button