breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘करोनाने तुमच्या कानात येऊन सांगितलंय का?’, सुधीर मुनगंटीवार सभागृहातच…

मुंबई : कोरोना पार्श्वभूमीवर दोन दिवसीय विधानसभेचे हिवाळी अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे. यातच चर्चेदरम्यान ठाकरे सरकारविरोधात भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहातच संताप व्यक्त केला आहे. लोकशाहीला बेशुद्ध करण्याचं काम सुरू आहे असं ते म्हणाले. सर्व समित्या कोमामध्ये आहेत म्हणत लोकल सुरु करता येते तिथं करोनाचा त्रास होता नाही का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटरला सभागृहातील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ते म्हणत आहेत की, “नियमाच्या पुस्तिकेनुसार पहिल्या अधिवेशनाच्या आत हे व्हायला हवं. विधानपरिषदेची नावं येत नाहीत म्हणून समित्यांचं काम होऊ द्यायचं नाही. महाराष्ट्राच्या जनतेला यामध्ये राजकारण सुरु आहे हे कळू द्या. लोकशाहीला बेशुद्ध करण्याचं काम सुरू आहे”.

“लोकल सुरु करता येते तिथं करोनाचा त्रास होता नाही. पण उद्या आम्ही बैठक घेतली तर करोना व्हायरसने तुम्ही बैठक घेतली तर याद राखा असं सांगित आहे,” असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. बैठका सुरु झाल्यात असा आदेश द्या अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करताना तुम्ही नोटिफिकेशन द्यायलाही तयार नाही अशी टीका केली. सर्व समित्या कोमामध्ये आहेत अशी टीका यावेळी त्यांनी केली.

कामकाजाला सुरुवात होण्याआधीच सुधीर मुनगंटीवार कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता आहे असं सांगत संताप व्यक्त केला. ‘आपण महाराष्ट्र विधानसभेच्या १८० पानांचं नियमांचं पुस्तक दिलं. ३२० नियम त्यामध्ये आहेत.’ असं ते यावेळी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button