इलेक्ट्रिशियनची मुलगी होणार देशातील तरूण महापौर, फडणवीसांनाही मागे टाकले
आर्या राजेंद्रन ही 21 वर्षीय तरुणी देशातील सर्वात तरूण महापौर ठरणार आहे. लवकरच ती केरळची राजधानी तिरुवनंतपुरम महानगरपालिकेची महापौर बनणार आहे.
केरळमध्ये नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत 21 वर्षीय आर्या मुडवणमुगल वार्डातून विजयी झाली आहे. ती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तिकीटावर विजयी झाली आहे. ती स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची राज्य कार्यकारिणीची सदस्य देखील आहे. ती ऑल सेंटस कॉलेजमध्ये बीएस्सी मॅथ्सचे शिक्षण घेत आहे.
आर्याने महापालिकेची पहिल्यांदाच निवडणूक लढवली. CPIM च्या जिल्हा सचिवालयानेच तिच्या उमेदवारीची शिफारस केली होती. एवढ्या लहान वयात नगरसेवक होण्याची संधी त्यांना मिळाली. पण त्याहून मोठा मान तिला महापौरपदासाठी निवड झाल्यानंतर मिळाला.
वाचाः Video: पाच महिन्याच्या पाळीव कुत्र्याला पट्ट्याने मारलं, कंपनीने थेट त्याला
सर्वात तरूण महापौर होण्याचा विक्रम महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आहे. फडणवीस वयाच्या 27व्या वर्षी 1997 साली नागपूर महापालिकेचे महापौर झाले होते. पण महापौरपदाची शपथ घेतल्यानंतर आर्या देशातील सर्वात तरूण महापौर ठरेल.