आनंदाची बातमी! सीरमच्या covishield, भारत बायोटेकच्या Covaxin लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी
कोरोना व्हयरसच्या लसीवर अनेक देश संशोधन करत होते. भारतसुद्धा या लसीची आतुरतेने वाट पाहत होता. पण भारतीय नागरिकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI चे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या covishield, भारत बायोटेकच्या Covaxin लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.
शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना तज्ज्ञ समितीनं मान्यता दिली होती. ज्यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DCGI कडून आज परवानगी मिळाली आहे. सोबतच कॅडीलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे.
वाचाः ‘अनसंग वॉरिअर्स’च्या लढ्यामुळेच पिंपरी- चिंचवडकरांची कोरोनावर मात!
कोवॅक्सिन ही भारत बायोटेकद्वारा विकसित केलेली देशी लस आहे. अशा प्रकारे तज्ज्ञ समितीने मंजूर केलेली ही दुसरी लस आहे. यापूर्वी, ऑक्सफोर्डच्या लसीला तज्ज्ञ समितीनं मान्यता दिली होती.
भारतात जगभरातील सर्वात मोठ्या लसीकरण प्रक्रियेला सुरुवात होत असतानाच अनेक अफवा पसरण्याचीही शक्यता आहे. पण, अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केलं आहे.