आनंदाची बातमी! देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्द कोरोनामुक्त
![48 thousand 698 new corona patients in the last 24 hours in the country; 1,183 corona victims](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/319718852-corona-1532x900-adobestock-1.jpg)
कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमध्ये एक आनंदाची बातमी येत आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज (शुक्रवारी ) कोरोनामुक्त झालेल्या शेवटच्या एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता हद्दीत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली.
कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1343 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
त्यातील एकूण 1308 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. होम आयसोलेशन, रुग्णालय आणि सक्रिय रुग्णांची संख्या शून्य असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
सध्या हद्दीत कोरोनाचा एकही रुग्ण नाही. मात्र, तरीही नागरिकांनी गाफील राहू नये. नागरिकांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.