Breaking-newsUncategorizedपिंपरी / चिंचवड
आकुर्डी डी.वाय.पाटील संकुलात १५ डिसेंबरला ‘विंटर कार्निव्हल’चे आयोजन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/d.-y.-patil-218x150.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – आकुर्डी येथील डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘विंटर कार्निव्हल २०१८’ चे १५ आणि १६ डिसेंबररोजी आयोजन करण्यात आले आहे.
या कार्निव्हलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वंकष विकासासाठी विविध खेळ, सांगितिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवेशपत्रिका देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे विभागातील उच्च माध्यमिक शाळा, व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी या कार्निव्हलमध्ये भाग घेऊन आपल्या विविध गुणांना वाव देण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे