Uncategorizedपुणे

आई-वडील रागावले अन् त्याने एकदमच…

तेरा वर्षांच्या बालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. इंदापूर तालुक्यातील पिंपळे गावातील कृष्णा भगवान चोरमले असे आत्महत्या केलेल्या बालकाचे नाव आहे. आई-वडील रागवल्याचा राग मनात धरुन कृष्णाने आत्महत्या केली.

बुधवारी कृष्णा घरी न सांगता परगावी फिरायला गेला. गावातील ओळखीच्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर बसून तो इंदापूरला गेला होता. याच कारणामुळे घरातल्यांनी त्याला रागवून विचारणा केली. याचाच राग मनात धरून कृष्णाने आई वडील बाहेर गेल्यानंतर गळफास घेतला. कृष्णाने कॉटवर उभे रहात साडीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेतला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button