breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर विचित्र अपघात, कंटेनर पलटी झाल्याने कारचा चक्काचूर

अपघातात दोघांचा मृत्यू तर ४ जण जखमी

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर विचित्र अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर विरूद्ध बाजुच्या लेनवर पलटी झाला आहे. यामध्ये पाच वाहनांचा अपघात झाला आहे. या अपघातात एका कारचालकाचा तर एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-४६, एआर ०१८१ कंटेनर पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जात होता. यावेळी चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर बाजुच्या लेनवर पलटी झाला. यावेळी समोरून येणाऱ्या भरधाव वााहनांची धडक झाली. यामध्ये एका सुझुकी डिझायर कारचा (एमएच- ४८,ए ६५१२) चक्काचूर झाला आहे.

हेही वाचा – ‘दररोज मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर’; भाजप नेत्याचं विधान चर्चेत

हा अपघात इतरा भीषण होता की यामध्ये कार चालकाचा आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील इतर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर एमजीएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनची वाहतूक सेवा विस्कळीत झाली. दरम्यान, या मार्गावर संत गतीने वाहतूक सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button