breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

Maharashtra Kesari : आज ठरणार कोण होणार महाराष्ट्र केसरी गदेचा मानकरी?

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी होणार का?

पुणे : स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची शेवटच्या लढती आज होणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम विजेता कोण होणार हे आज समजणार आहे. आजची मॅट विभागातील अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात होणार आहे. तर माती विभागातील अंतीम लढत सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात होणार आहे. या दोन्ही लढतीकडं आज सर्वाचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्र केसरी ही माती व गादी विभागात होते. यामध्ये माती विभागातील विजेचा मल्ल व गादी विभागातील विजेता मल्ल यांच्यात महाराष्ट्र केसरी गदेसाठी अंतिम लढत होते. ही लढत आंतरराष्ट्रीय नियमांनुसार मॅटवर होत. या लढतीमधील अंतिम विजेता मल्ल हा महाराष्ट्र केसरी होतो. त्या मल्लास महाराष्ट्र केसरीची मानाची गदा बहाल केली जाते.
2020 मध्ये पुण्यातील बालेवाडीत 63 व्या कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन सदगीरने महाराष्ट्र केसरीचे विजेतपद पटकवले होतं. त्याला मॅटवरील कुस्तीचा तगडा अनुभव आहे. आक्रमक खेळाडू म्हणुन त्याची ओळख आहे. सदगीर डबल महाराष्ट्र केसरी होणार का, हे आज स्पष्ट होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना पार पडणार आहे. सिकंदर शेख आणि शिवराज राक्षे हे यंदाच्या महाराष्ट्र केसरी किताबाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आज संध्याकाळी आधी मॅट आणि त्यानंतर माती विभागातील अंतिम लढती खेळवण्यात येतील. यातील विजेत्यामधून महाराष्ट्र केसरीची अंतीम लढत खेळवण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button