Uncategorizedताज्या घडामोडीमराठवाडा

उद्धव ठाकरेंविषयी केलेल्या ट्विटमुळं राज्याच्या राजकारणात खळबळ, संजय शिरसाट यांनी सगळं उलगडून सांगितलं

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार संजय शिरसाट यांच्या उद्धव ठाकरेंविषयी केलेल्या ट्विटमुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. संजय शिरसाट यांनी त्यांच्या ट्विटरवर उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ पोस्ट केला होता. तर, ट्विटरच्या डीपीमध्येही संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो लावला होता. मात्र, माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो हटवून एकनाथ शिंदे यांच्या सोबतचा फोटो डीपीवर ठेवला. तर, याशिवाय पुन्हा ते ट्विट देखील डिलीट केलं. आज सकाळी पत्रकार परिषद घेत संजय शिरसाट यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

मोबाईलची तांत्रिक अडचण

माध्यमांमधील लोकांचा फोन आल्यानंतर काहीतरी ट्विट झाल्याचं संजय शिरसाट म्हणाले. मी भावनेच्या भरात उद्धव ठाकरेंना कुटुंबप्रमुख म्हणालो. परंतु, तो माझ्या मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम होता, मागची पोस्ट कशी फॉरवर्ड झाली हे सांगता येणार नाही. एक गोष्ट निश्चित आहे, की आम्ही सर्वजण उद्धव ठाकरेंना तुम्ही पक्षप्रमुख राहा आणि सत्ता दुसऱ्याच्या हातात द्या, असं संजय शिरसाट म्हणाले. माझ्या मोबाईलवरुन झालेली चूक म्हणा किंवा तांत्रिक अडचण होती. मी त्या गोष्टीचं समर्थन करणार नाही, मी एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे, त्यांच्या सोबतचं राहणार आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.

मी कधीही दबावतंत्र वापरलेलं नाही. मी माझी भूमिका ज्यांच्यासमोर मांडायची आहे ती मांडली आहे. दबावतंत्र आणि उठाव माझ्या स्वभावात नाही.

मोबाईल वापरु नये या मतावर आलो

संजय शिरसाट यांनी मोबाईल बंद करायची वेळ आली आहे. मोबाईल वापरु नये या मतावर मी आलो आहे. रेकॉर्डिंग ही फॅशन झालेली आहे. मंत्र्यांपासून सर्वांना ही प्रचिती आली आहे. रात्री जे ट्विट झालं होतं ते मार्च महिन्यात ड्राफ्ट केलं होतं. ते अचानक लाईव्ह गेलं, व्हिडिओची वेळ चुकलीय, असं संजय शिरसाट म्हणाले. मोबाईल वापरणे धोकादायक असल्याचं संजय शिरसाट म्हणाले.

कॅबिनेट आणि पालकमंत्रिपद मागितलं

संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे कॅबिनेट आणि पालकमंत्रिपद मागितल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदे यांच्या मनात असलेली भूमिका रेटून नेतात, असं संजय शिरसाट म्हणाले. आमचा ५० लोकांचा गट आहे, प्रत्येकाला काहीतरी मिळावं, असं वाटतं. महामंडळ आणि मंत्रिपदाची अपेक्षा असणं गैर नाही, असंही संजय शिरसाट म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button