breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

तालिबानी राजवटीने बदलला अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष

  • २०१९ वर्ल्ड कपपर्यंत असलेल्या अध्यक्षांची केली फेरनिवड

काबूल –  अझीझउल्ला फजली  यांची अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या  कार्यकारी अध्यक्षपदी  रविवारी नियुक्ती करण्यात आली. अमेरिकेने आपलं सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी बोलवल्यानंतर आणि राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी  यांनी पलायन केल्यानंतर तालिबान्यांना (Taliban) अफगाणिस्तान काबीज केले. त्या घटनेनंतर अफगाणिस्तानच्या क्रिकेट जगतासंदर्भात ही पहिलीच मोठी घटना घडली. “ACB चे माजी अध्यक्ष अझीझउल्ला फजली यांची बोर्डाच्या कार्यकारी अध्यक्षपदी पुन:श्च नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काळातील सर्व स्पर्धात्मक क्रिकेटबद्दलचे निर्णय घेण्याची जबाबदारी फजली यांच्यावर सोपवण्यात आली आहे”, असे ट्वीट बोर्डाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून करण्यात आले.

फजली यांनी या आधी अतिफ माशल यांच्या राजीनाम्यानंतर सप्टेंबर २०१८ ते जुलै २०१९ या कालावधीत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद सांभाळले आहे. २०१९च्या वन डे विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान गुणतक्त्यात तळाशी राहिल्यामुळे फजली यांना पदावरून हटवून फरहान युसूफजाई यांना त्या पदावर नियुक्त करण्यात आले होते. फजली हे गेल्या २० वर्षांपासून अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डासाठी काम पाहत आहेत. अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटची पायाभरणी करणाऱ्या सुरूवातीच्या खेळाडूंपैकी ते एक आहेत. देशासाठी क्रिकेट खेळून झाल्यानंतर त्यांनी बोर्डाच्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष आणि सल्लागार ही पदेदेखील भूषवली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button