breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

तालिबानने चौकशीच्या नावाखाली विमाने रोखली; परदेशी लोक अडकले

काबूल – अफगाणिस्तानात अजूनही अमेरिकेसह इतर देशांचे अनेक नागरिक दुसऱ्या देशांचा व्हिसा मिळाल्यानंतर त्यांची निघण्याची मुदत जाऊन सहा दिवस उलटले तरी तिथेच अडकून पडले आहेत. तालिबानने त्यांचे चौकशीच्या नावाने विमान उड्डाण रोखले आहे.

ज्या देशांचे नागरिक अडकले आहेत त्यांच्या सरकारांसमोर संकट आहे की, त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणत्या गटाशी चर्चा करायची. कारण अद्याप तालिबानी सरकारची घोषणा झालेली नाही. मात्र सरकारे वेगवेगळ्या पातळीवर या लोकांना बाहेर काढण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत. तर तालिबान अमेरिका आणि कतारच्या अधिकाऱ्यांसोबत लोकांना बाहेर काढण्यासाठी विमान उड्डाणे आणि त्यांच्या प्रस्थानास मंजुरी देण्याबाबतची चर्चा मुद्दाम दीर्घकाळ सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे लोकांची निघण्याची वेळ निश्चित होत नाही. आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे की, दिवसेंदिवस लोकांची सुरक्षाही संकटात येत आहे. उत्तरेतील शहर मजार-ए-शरीफमध्ये विमानतळावर देश सोडण्याच्या आशेने आलेल्या लोकांची स्थिती वाईट होत आहे. आता मजार-ए-शरीफमध्ये याबाबत संभ्रम आहे की, चार्टर्ड विमाने अमेरिका किंवा इतर पश्चिमेतील देशांसाठी येथून निघतील कशी? कारण तालिबानने अमेरिकेला मदत करणाऱ्या लोकांना सुरक्षित निघू देण्याचे कोणतेही आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे हे लोक काबूल विमानतळावर तालिबानी नियंत्रणामुळे उड्डाण करू शकलेले नाहीत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button