breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘आमदार अपात्रतेचा निर्णय ३१ डिसेंबरपूर्वी घ्या’; सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा नार्वेकरांना सुनावले

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय ३१ डिसेंबरपूर्वी घ्या असे निर्देश सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. आम्ही निकाल देऊन इतके दिवस झाले आहेत तुम्ही काहीही निर्णय का घेतला नाहीत? असं म्हणत राहुल नार्वेकर यांना सरन्यायाधीशांनी सुनावलं आहे.

आमदारांच्या अपात्रतेबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांमधील आमदारांबाबत एकत्रित सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी मागितली मुदत फेटाळून लावली. जर अध्यक्ष याबाबत निर्णय घेत नसतील तर नाईलाजाने आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. मे महिन्यात निर्णय देऊनही तुम्ही आतापर्यंत काहीच केले नाही. अशी वेळ येऊ देऊ नका की आम्हाला अपात्रतेचा निर्णय घ्यावा लागेल. एकनाथ शिंदेंविरोधातल्या ३४ याचिकांवर ३१ डिसेंबरच्या आत निर्णय घ्या, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! मराठा समाजाला उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र मिळणार

३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देत एक प्रकारचा थेट अल्टिमेटमच सर्वोच्च न्यायालयानं आजच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयानं दिलेली डेडलाईन पाळली नाहीतर मात्र सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप करुन एक निश्चिच तारीख किंवा निश्चित वेळमर्यादा ठरवण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button