breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘लोकमान्य’ने कोविड काळात केलेली रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

पिंपरी / महाईन्यूज

लोकमान्य हाॅस्पिटल व आयकार्डिन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य हाॅस्पिटल, निगडी येथे” स्ट्रोक केअर सेंटर” सुरु करण्यात येत आहे. याचे उद्घाटन महापौर माई ढोरे व पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या शुभहस्ते बुधवारी (दि. १७) करण्यात आले. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, लोकमान्य हाॅस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डाॅ. नरेंद्र वैद्य, आयकार्डिनचे संचालक समीर मोरे, न्युरो फिजिशियन डाॅ. अमितकुमार पांडे, डाॅ. मिहीर इंगळे, डाॅ. किरण नाईकनवरे, असो. व्ही .पी. डाॅ. श्रीकृष्ण जोशी, ग्रुप सि.ओ.ओ. सुनिल काळे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे उपस्थित होते.

हार्ट अॅटॅक, अपघात याविषयी लोकांमध्ये जागृती आहे. पण, आजही ब्रेन स्ट्रोकबाबत लोक अनभिज्ञ आहेत. गोल्डन अवरमध्ये तातडीक सेवा मिळाली तर यामुळे उपचाराअभावी होणारे कायमचे अंपगत्व दुष्पपरिणाम तसेच प्रसंगी उद्भवणारी जिवीतहानी टाळता येवु शकते. हे काम अत्यंत महत्वाचे असल्याने हा उपक्रम पिंपरी-चिंचवडमधील नागरिक मुख्यतः ज्येष्ठ नागरिकांसाठी फारच उपयुक्त आहे. लोकमान्य ने कोविडच्या काळातील गरजुंची केलेली सेवा ही खरी ईश्वरसेवा असून त्यांनी हा लोकसेवेचा रथ “चरैवती, चरैवती“ असाच चालत ठेवावा, असे गौरवोद्गार पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी काढले.

अत्याधुनिक तंत्रज्ञान व समर्पित डाॅक्टरांची टीम यांच्या संयुक्त प्रयत्नाने ब्रेन स्ट्रोक, इपिलेप्सी, न्युरो डिसाॅडर्स आदी समस्यांवर उपचाराची सुविधा वेळीच उपलब्ध होतील. पाश्चित्य देशाप्रमाणे जागतिक स्तरावरील प्रोटोकाॅलचे पालन करुन एक उत्तम सुविधा या सेंटरच्या माध्यमाव्दारे देण्यात येईल. अपघातग्रस्तांना जशी तातडीक सेवा देवुन लाखो लोकांचे प्राण वाचविण्याचे काम केले. तसेच, हे काम निष्ठेने करण्यात येईल असे डाँ. नरेंद्र वैद्य यांनी सांगितले.

तोंड वाकडे होणे, हाता पायातील ताकद कमी होणे, तोतरे बोलणे, जीभ जड वाटणे, बेशुद्घ होणे अशी लक्षणे असल्यास नागरिकांनी ९८२२२४२१०० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यास मोफत अँम्ब्युलन्स सेवा रुग्णांना उपचारासाठी देण्यात येईल, अशी माहिती डाॅ. श्रीकृष्ण जोशी यांनी दिली.

या सेंटरची संकल्पना व प्रास्ताविक सुप्रसिद्ध न्युरोफिजीशियन डाॅ. अमित पांडे यांनी केले. समीर मोरे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button