ताज्या घडामोडीमुंबई

लता मंगेशकरांच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय नियोजित जागेतच होणार

मुंबई | आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचे लता मंगेशकर यांचे स्वप्न होते. आता ते स्वप्न सत्यात उतरणार असून तंत्र शिक्षण विभागाकडे असणाऱ्या कलिना संकुलाच्या समोरील तीन एकर जागेत लता मंगेशकरांच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

उद्या सामंत यावेळी बोलताना म्हणाले की, भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी विद्यापीठाकडे जागा मागितली होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही जागा मिळू शकली नाही. कलिना संकुलाच्या अगदी समोर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे तीन एकरची जागा आधी इंडियाबुल्स कडे होती. ती जागा आता पुन्हा विभागाच्या ताब्यात आहे. त्या जागेवर भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय निर्माण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असे सामंत म्हणाले. आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचे लता मंगेशकर यांचे स्वप्न होते. कलिना कॅम्पससमोर असे विद्यालय स्थापन करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. आता याच समितीने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे नाव भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर असे असावे असा प्रस्ताव दिला असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

दरम्यान, परीक्षांसंदर्भात उत्तर देताना सामंत म्हणाले की, कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने आता आपल्याला ऑफलाइन परीक्षाकडे वळावे लागणार आहे. त्यामध्ये कुठलाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची सुद्धा काळजी घेतली जाईल. अजूनही काही भागात एसटी बंद आहेत. यामुळे जर परीक्षा विद्यार्थ्यांना देता येत नसतील तर त्यासाठी सुद्धा पर्यायी व्यवस्था आम्ही करणार आहोत. मात्र आता कुठल्याही स्थितीत ऑफलाइन परीक्षा सुरूच कराव्या लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button