ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

सोने कारागीर याने रेल्वेखाली झोकून आत्महत्या केली

जळगाव | दिवसभर सहकाऱ्यांसोबत काम केलं, नाश्ता करुन येतो, असे सहकाऱ्यांना सांगून तो दुकानातून बाहेर पडला. व त्याने थेट रेल्वेरुळ गाठत रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. प्रसनजीत प्राणकीशन कबीराज (वय-१८) रा. बलीदेवांगंज जि. हुगली, पश्चिम बंगाल, ह.मु. मारोती पेठ, जळगाव असे मयत सोने कारागिराचे नाव आहे. जळगाव शहरातील आसोदा रेल्वेगेटजवळ त्याने आत्महत्या केल्याचे मंगळवारी समोर आले आहे. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.

असा घडला सर्व प्रकार…

शनीपेठपोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसनजीत कबीराज हा गेल्या दीड महिन्यांपासून सोने कारागीर म्हणून काम करण्यासाठी पश्चिम बंगालहून जळगाव शहरात आला होता. शहरातील मलाईकर यांच्याकडे तो सोन्याची दागिने तयार करण्याचे काम करून उदरनिर्वाह करत होता. सोमवारी १८ एप्रिल रोजी दिवसभर काम केल्यानंतर रात्री १० वाजता तो आपल्या सहकार्‍यांना मी बाहेरुन नाश्ता करुन येतो असे सांगून दुकानातून बाहेर पडला. त्यानंतर त्याने आसोदा रेल्वे गेटजवळील अपलाईनवरील खांबा क्रमांक ४२० ते ४२२ दरम्यान धावत्या रेल्वेखाली झोकून देत आपले जीवन संपविले.

खिशातील आधारकार्डवरुन पटली ओळख

स्टेशन मास्तर एम. अग्रवाल यांनी या घटनेची माहिती शनिपेठ पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे व सहाय्यक फौजदार रघुनाथ महाजन यांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. मयताची अंगाची झडती घेतली असता, त्याच्याकडे मोबाईल व आधारकार्ड आढळून आले. त्यावरुन त्याची ओळख पटली. प्रसनजीत हा एकूलता एक मुलगा होता. त्याच्या पश्‍चात आई, वडील, आजी, आजोबा असा परिवार आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button