breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सीमेवर पुन्हा तणाव! जैश-ए-मोहम्मदचा कमांडर सज्जाद अफगानी याचा खात्मा

श्रीनगर – जम्मू काश्मीरच्या शोपियान भागामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार धुमश्चक्री झाली. शोपियानच्या रावलपोरा गावामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे या दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये जैश-ए-मोहम्मदचा जम्मू-काश्मीरमधील कमांडर सज्जाद अफगानी याचा खात्मा करण्यात भारतीय फौजांना यश आलं आहे.

वाचा :-देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,13,85,339 वर

सज्जाद जैशसाठी नव्या तरूणांना भरती करून त्यांना प्रशिक्षण देण्याच्या यंत्रणेत सहभागी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, ही धुमश्चक्री अजूनही सुरू असल्याची माहिती मिळत असून अजूनही दोन दहशतवादी रावलपोरामधल्या एका घरात लपले असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात एएनआयने ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button