ताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘या’ स्रोतांवर मिळवा कर सवलतीचा फायदा

आपल्या देशात आयकर कायद्यांतर्गत भविष्य निर्वाह निधी (पीएफ), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अर्थात नॅशनल पेन्शन स्किम व्यतिरिक्त अन्य पाच उत्पन्नाचे स्रोत असेही आहेत की त्यावर कोणताही कर लागू नसतो, त्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

आयकर कायद्यांतर्गत, देशात किंवा परदेशात शालेय ते महाविद्यालयीन स्तरापर्यंतच्या सर्व प्रकराच्या शिक्षणादरम्यान मिळालेल्या शिष्यवृत्ती अर्थात स्कॉलरशीपवर 100 टक्के कर सूट दिली जाते. तसेच सरकारी किंवा खासगी संस्थांकडून अभ्यास किंवा संशोधनासाठी मिळालेल्या स्कॉलरशीपवर कोणताही कर भरावा लागत नाही.

आई-वडिलांकडून मिळालेली मालमत्ता, दागिने आणि रोख रक्कमेवर करदात्याला कोणताही कर भरावा लागत नाही. तथापि, जर करदात्याने पैसे गुंतवून पैसे कमावले आणि मालमत्तेतून उत्पन्न किंवा व्याज मिळवले तर त्याला यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागेल.

जर तुम्ही एखाद्या कंपनीत भागीदार असाल, तर नफ्याचा शेअर म्हणून मिळालेली रक्कम करपात्र नसते. म्हणजेच त्यावर कोणाताही कर भरावा लागणार नाही, कारण संबंधित कंपनीने त्यावरील कर आधीच भरलेला असतो. ही कर सूट केवळ नफ्यावर असते, मिळणाऱ्या वेतनावर नाही.

सर्वसाधारणपणे आयकर कायद्याअंतर्गत भेटवस्तू या कराच्या कक्षेत येतात. परंतु, जर तुम्हाला एखादी भेटवस्तू लग्नात मिळाली तर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 100 टक्के कर सवलत मिळते. मात्र, याकरिता लग्नाच्या तारखेला किंवा आसपासच्या तारखेजवळ भेटवस्तू मिळाली असावी, अशी अट आहे. महत्त्वाचे म्हणजे करदात्याला एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंतच्या भेटवस्तूंवर कोणताही कर भरावा लागत नाही.

एखाद्या कर्मचाऱ्याने सलग पाच वर्षं किंवा त्याहून अधिक काळ एखाद्या संस्थेत काम केले असेल, तर नोकरी सोडल्यावर मिळणारी ग्रॅच्युइटीची रक्कम ही कर सवलतीच्या कक्षेत येते. सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत 20 लाख रुपयांपर्यंत आणि खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत 10 लाखांपर्यंतच्या ग्रॅच्युइटीच्या रक्कमेवर कर द्यावा लागत नाही.

याशिवाय शेतीतून मिळणारे उत्पन्न कराच्या कक्षेत येत नाही. याचाच अर्थ शेतकरी शेतीतून जे काही उत्पन्न मिळवतो, त्यावर त्याला कोणताही कर भरावा लागत नाही.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button