घरबसल्या पाहता येणार ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट; कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या..
Swatantra Veer Savarkar | वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच घरी बसून पाहता येणार आहे. ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटात रणदीप हुड्डाने वीर सावरकर यांची भूमिका साकारली होती. मुख्य भूमिका करणाऱ्या रणदीपने चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून रणदीपने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. या चित्रपटात अंकिता लोखंडे व अमित सियाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली होती, पण चित्रपटाला बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आलं आहे.
हेही वाचा – दहावीचा निकाल २७ मे रोजी, शिक्षण मंडळाकडून तारीख जाहीर
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट Zee5 वर 28 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अंकिता लोखंडेने सावरकरांच्या पत्नी यमुनाबाईंची भूमिका केली होती.