राष्ट्रिय
एच. डी. कुमारस्वामी यांना हादरा?, सुमनलता आघाडीवर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/तचटकर.jpg)
कर्नाटकमधील मंड्या या मतदारसंघात सुमनलता अंबरीश या १२०० मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघात त्यांच्यासमोर एच डी कुमारस्वामी यांचे पूत्र निखील हे रिंगणात आहेत. सुमनलता या कर्नाटकमधील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते अंबरीश यांच्या पत्नी असून अंबरीश हे १९९८ ते २००९ या कालावधीत तीन वेळा या मतदारसंघाचे खासदार होते.
या जिल्ह्यात देवेगौडा कुटुंबाची ताकद असून भाजपाने या भागात सुमनलता यांना पाठिंबा दिला आहे. कर्नाटकमध्ये लोकसभेच्या २८ जागा असून यातील २३ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर काँग्रेस तीन जागांवर आणि जनता दल धर्मनिरपेक्ष एका जागेवर आघाडीवर आहे.