breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तातडीची गरज म्हणून शहरात आणखी ३ ‘जम्बो कोविड रुग्णालय’ सुरु करा- सचिन साठे

पिंपरी |

कोरोना कोविड -19 बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पिंपरी चिंचवड शहरात वीस हजारांहून जास्त रुग्ण ‘होम क्वॉरंटाईन’ आहेत. या रुग्णांमुळे अनेक कुटूंबातील इतर सदस्य देखिल बाधित होत आहेत. मनपाच्या कोणत्याही रुग्णालयात आणि संस्थात्मक विलगीकरण केंद्रात साधारण बेड देखिल उपलब्ध नाहीत. अनेक ज्येष्ठ रुग्णांचा मृत्यू ऑक्सीजन किंवा व्हेंन्टीलेटरची सुविधा मिळाली नाही यामुळे होत असल्याचे निदर्शनास येत आहे. रुग्ण मृत्यूचे प्रमाण देखिल मागील दहा दिवसात वाढते आहे. हि चिंताजनक परिस्थिती विचारात घेऊन तातडीची गरज म्हणून पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील यांनी आपल्या अधिकारात सांगवी येथे एक आणि भोसरी सर्व्हे नं. 1 गावजत्रा मैदान येथे एक तसेच प्राधिकरण निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदान येथे एक असे तीन जम्बो कोविड रुग्णालय सुरु करावेत अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

प्रथम मार्च 2020 मध्ये कोरोनाचे रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये आढळले. दुस-या लाटेत कालपर्यंत बाधितांचा आकडा 1,86,025 झाला आहे. मागील पंधरा दिवसात मृत्यूचा वाढता आकडा देखिल चिंताजनक आहे. कोरोना महामारीची पहिली लाट ओसरल्यानंतर मधल्या काळात वैद्यकीय सेवा सुविधांसाठी पायाभूत सेवा सुविधा, मोठी रुग्णालये उभारणे आवश्यक होते. या पहिल्या लाटेतून मनपा प्रशासनाने काहीही बोध घेतल्याचे दिसत नाही. शहरातील कष्टकरी जनतेच्या कराच्या पैशातून सुरु असणारी इतर विकास कामे स्थगित करुन आयुक्तांनी प्राधान्याने वैद्यकीय आणि आरोग्य विभागाकडे निधी वर्ग करावा. आवश्यक असणारे प्रशिक्षित मनुष्यबळ नेमावे. पदाधिका-यांनी देखिल मनपाचा खजिना सामान्य नागरीकांसाठी खुला करण्याचे औदार्य दाखवावे असेही आवाहन कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केले आहे.

वाचा- आमदार महेश लांडगे यांचा दणका: पिंपरी-चिंचवडला मिळाला पहाटे ऑक्सिजन पुरवठा!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button