breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

आमदार महेश लांडगे यांचा दणका: पिंपरी-चिंचवडला मिळाला पहाटे ऑक्सिजन पुरवठा!

  • जिल्हा प्रशासन, अन्न औषध प्रशासन अखेर नमले
  • तरीही दोन दिवस पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी- शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजन साठा पुरवण्यात हयगय करणाऱ्या जिल्हा प्रशासन तसेच अन्न औषध प्रशासनाला अखेर नमते घ्यावे लागले. जिल्हा प्रशासनाने बुधवारी पहाटे शहरासाठी दोन टँकर ऑक्सिजन साठा उपलब्ध करुन दिला आहे. जिल्हा प्रशासनाकडून पुरवण्यात येणारा ऑक्सिजन टँकर मंगळवारी सांयकाळी पुण्याकडे वळवण्यात आला होता. ही बाब महापालिका अधिकारी आणि भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या लक्षात आल्यानंतर प्रसंगावधान राखत तात्काळ कार्यवाही करण्यात आली.

पिंपरी-चिंचवडच्या हक्काचा ऑक्सिजन टँकर पुण्याकडे पळवण्याचा डाव महापालिका प्रशासन आणि आमदार लांडगे यांनी हाणून पाडला होता. त्यानंतर सकाळी ऑक्सिजनचे आणखी दोन टँकर उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या उपायुक्त स्मीता झगडे यांनी दिली. शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. शासकीय रुग्णालयांसाठी आणलेला ऑक्सिजन एक टँकर सोमवारी पिंपरी-चिंचवडला दिला नाही. त्यानंतर मंगळवारी पुन्हा प्रशासनाने ऐनवेळी ऑक्सिजन टँकर न देण्याचा निर्णय घेतला. याबाबत लोकप्रतिनिधींनी विनवनी करण्यासाठी संपर्क केला. पण, प्रतिसाद मिळाला नाही. यावर आमदार महेश लांडगे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

पिंपरी-चिंचवडला आरोग्य सुविधांबाबत दुजाभाव केला जात असेल, तर प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. दोन दिवसांपूर्वी चाकण येथे तीन रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे. शहरातील सुमारे ६०० रुग्णांना सध्या ऑक्सिजनची गरज आहे. असे असताना जिल्हा प्रशासन हलगर्जीपणा करीत आहे, अशी टीका आमदार लांडगे यांनी केली होती. औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये ऑक्सिजनचा साठा संपुष्ठात आल्याची बातमी राज्यात पसरली. प्रशासनावर दबाव वाढला आणि अखेर शहरासाठी बुधवारी पहाटे २ टँकर ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शहरातील सुमारे ४ हजार रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
*
ऑक्सिजनचा उपलब्ध साठा पुरेसा नाही : आमदार लांडगे्
पुणे जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेला ऑक्सिजन साठा दोन दिवस पुरेल इतकाच आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सर्वांची धावपळ सुरू आहे. शहरातील रुग्णांना आवश्यक ऑक्सिजन पुरवठा झाला नाही, तर मोठं संकट कोसळण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन टँकरबाबत सकारात्मक भूमिकेतून पिंपरी-चिंचवडकरांच्या भावनांचा विचार करावा. तसेच, ऑक्सिजन उत्पादनाचे स्त्रोत निर्माण करावेत, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

वाचा- नाशिकमध्ये ऑक्सिजन टाकीला गळती; 22 रुग्णांचा मृत्यू – जिल्हाधिकारी सुरज मांढरे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button