क्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेश

वूमन्स टीम इंडियाचा एकमेव कसोटी सामन्यात दणदणीत विजय

सामन्याच आयोजन चेन्नईतील एमए चिंदबरम स्टेडियममध्ये करण्यात आले

चेन्नई : हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वूमन्स टीम इंडियाने भारत दौऱ्यावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला वनडे सीरिजमध्ये 3-0 अशा फरकाने क्लिन स्वीप दिला. त्यानंतर वूमन्स टीम इंडियाने एकमेव कसोटी सामन्यात 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. त्यानतंर आता 5 जुलैपासून वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील सलामीच्या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एमए चिंदबरम स्टेडियममध्ये करणयात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस पार पडला. टीम इंडियाने टॉस जिंकला. कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने फिल्डिंगचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स
वूमन्स टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 16 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. त्या 16 पैकी सर्वाधिक सामन्यांमध्ये टीम इंडिया वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 16 पैकी 9 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने 5 सामन्यात यश मिळवलंय. तर 2 सामन्यांचा निकाल लागला नाही. टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिके विरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेत पराभव झाला होतो. दक्षिण आफ्रिकेने 2-1 च्या फरकाने ती मालिका गमावली होती. त्यामुळे टीम इंडियाचा गेल्या मालिका पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न असणार आहे.

वूमन्स टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल
दक्षिण आफ्रिका वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, मारिझान कॅप, ॲनेके बॉश, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, एलिझ-मारी मार्क्स, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), अयाबोंगा खाका आणि नॉनकुलुलेको मलाबा.

टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दयालन हेमलता, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button