breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार? केवळ ५ संघांना मिळणार संधी!

Olympics Cricket : लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ मध्ये होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ प्रथमच सहभागी होऊ शकतो. जंटलमन्स गेम अशी ओळख असणाऱ्या क्रिकेट या खेळाचा तब्बल १२८ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये समावेश होणार आहे. मात्र त्यासाठी अजून ५ वर्षांच्या कालावधी असून २०२८ साली अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार आहे.

‘द गार्डियन’मधील वृत्तानुसार, पुरुष आणि महिला संघ टी-२० क्रिकेट स्पर्धा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी पात्र ठरतील. क्रिकेटबद्दल जर बोलायचे झाले तर हा खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळला गेला आहे. १९०० मध्ये क्रिकेटला या खेळांच्या महाकुंभात स्थान मिळाले होते. आता १२८ वर्षांनंतर ते पुन्हा ऑलिम्पिकमध्ये परत येऊ शकते. २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट या खेळाचा समावेश होणार आहे.

हेही वाचा – सुपरस्टार रजनीकांत यांचं विधान चर्चेत; म्हणाले, मला दारूचं व्यसन नसतं तर..

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट हे टी-२० फॉर्मेटमध्ये खेळले जाईल. १९०० मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटच्या आधारावर त्याचे आयोजन करण्यात आले होते. आता २०२८ व्यतिरिक्त क्रिकेटला २०३२ च्या ब्रिस्बेन ऑलिम्पिकमध्येही स्थान मिळण्याची शक्यता आहे. प्रसारण हक्कातून मिळणारे उत्पन्न हे त्यामागचे प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जातंय.

महिला आणि पुरुष क्रिकेटला २०२८च्या लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळू शकते. टी-२० फॉरमॅटच्या आधारे त्याचे आयोजन केले जाईल. मात्र, दोन्ही गटात केवळ ५-५ संघांनाच संधी दिली जाईल. अशा स्थितीत अनेक मोठ्या संघांना संधी मिळत नाही. आयसीसी क्रमवारीच्या आधारे संघ ठरवले जाऊ शकतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button