breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

भारतीय संघाचा भावी कर्णधार कोण? सुनील गावस्करांनी घेतले ‘या’ खेळाडूचे नाव

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशिपच्या फयनल सामन्यात भारतीय संघाला मोठा पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा कर्णधारपद सोडेल असं बोललं जात आहे. दरम्यान, यावरून भारतीय माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या भावी कर्णधाराबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

सुनिल गावस्कर म्हणाले की, पहिलं नाव नक्कीच गिसचे आहे, जरी त्याने कधीही कर्णधारपद भूषवले नसले तरी त्याच्याकडे १९ वर्षांखालील संघाचे उपकर्णधारपदाचा अनुभव आहे. मला वाटते की गिल पुढे जाऊन भारताचे कर्णधार करू शकेल. त्याचवेळी अक्षरने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी उपकर्णधारपद भूषवले आहे. त्याच्याकडे अनुभव आहे. माझ्या मते, हे दोन खेळाडू भारतीय क्रिकेट संघाचे पुढील कर्णधार होऊ शकतात. शुभमन आणि अक्षर या दोन खेळाडूंशिवाय मी इशानकडे पाहतो, पण इशानला प्रथम प्लेइंग इलेव्हनमधील स्थान कायम राखावे लागेल. त्याच्याकडे क्षमताही आहे.

हेही वाचा – आदित्य ठाकरे यांना अटक होणार, भाजप नेत्याचा मोठा दावा

दरम्यान, भारताचा वनडे आणि कसोटी संघ जाहीर केला आहे. या संघात यशस्वी जैस्वालची वनडे संघात झाल्याने अश्चर्य व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, आयपीएलमध्ये जैस्वालने ज्याप्रकारे कामगिरी केली होती, त्याचप्रमाणे ते पाहता वनडे संघातही असणे अपेक्षितच होते. पुढे जाऊन त्याला छोट्या फॉरमॅटमध्येही संधी मिळेल. याशिवाय संजू सॅमसनचा वनडे संघात समावेश झाल्यामुळे आनंदी आहे, असंही सुनील गावस्कर म्हणाले.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल , मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (वीसी), शार्दुल ठाकूर, आर जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button