क्रिडाताज्या घडामोडीमुंबई

‘विराटला पुढील हंगामात कर्णधार बनवण्याचा विचार करावा’

माजी खेळाडूचा आरसीबीला सल्ला

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने हंगामाच्या मध्यात सलग पराभव पत्करल्यानंतर आता पाच सामन्यांत सलग विजय नोंदवले आहेत. आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शानदार विजय नोंदवला. या विजयानंतर आरसीबीचे जबरदस्त पुनरागमनाची सुरु चर्चा आहे. या सामन्यात विराट कोहलीचे एक्सप्रेशनही खूप गाजले. या सगळ्या दरम्यान माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने आरसीबीने आगामी हंगामासाठी विराट कोहलीला संघाचा कर्णधार बनवण्याचा विचार करावा, असा सल्ला दिला आहे.

भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने पुढील हंगामात आरसीबीचे नेतृत्व विराट कोहलीकडे देण्याचा सल्ला दिला आहे. हरभजनच्या मते, पुढील हंगामात आरसीबी संघाला पुढे नेण्यासाठी या अनुभवी खेळाडूकडे उत्साह, वचनबद्धता आणि आक्रमकता यांचा उत्तम संगम आहे. कोहली सध्याच्या आयपीएलमध्ये १३ सामन्यांत ६६१ धावा करणारा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या कालावधीत त्याने १५५.१६ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. आरसीबी १३ सामन्यांत १२ गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे आणि गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.

काय म्हणाला हरभजन सिंग?
स्टार स्पोर्ट्स कार्यक्रमात हरभजन म्हणाला, “जर आरसीबीची संघ प्लेऑफ्ससाठी पात्र ठरु शकला नाही, तर त्यांनी भारतीय खेळाडूकडे कर्णधारपदासाठी पाहावे. मग त्यासाठी विराट कोहलीच्या खांद्यावर पुन्हा एकदा कर्णधारपदाची सोपवली जाऊ नये. धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघावर खूप प्रभाव आहे, विराट कोहली देखील एक उत्तम कर्णधार आहे, त्याला माहित आहे की संघाला कोणत्या प्रकारचे क्रिकेट खेळणे आवश्यक आहे. आता त्यांचा संघ पण खूप आक्रमकतेने, उत्साहाने खेळतोय. विराट कोहलीच्या बाबतीतही तेच आहे. त्यामुळे मला विराट कोहलीला जबाबदारीने संघाचे नेतृत्व करताना पाहायला आवडेल.”

हरभजनने लखनऊच्या वादावरही केले भाष्य –
गेल्या बुधवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सच्या पराभवानंतर संघाचे मालक संजीव गोयंका यांनी राहुलसोबत केलेल्या आक्रमक संभाषणाबद्दल विचारले असता, हरभजन म्हणाला की या गोष्टी संघातील चांगल्या वातावरणासाठी योग्य नाहीत. तो म्हणाला, “कर्णधार आणि व्यवस्थापन यांच्यात मतभेद असू शकतात, परंतु ही चर्चा दाराआड व्हायला हवी जी प्रत्येकासाठी चांगली आहे. हे संभाषण ड्रेसिंग रुममध्ये व्हायला पाहिजे होते. जे काही संभाषण सुरू आहे, ते संघातील वातावरणासाठी चांगले नाही. ती वेळही असे बोलण्यासाठी योग्य नव्हती.”

शाहरुख खानचे दिले उदाहरण –
या संदर्भात हरभजनने कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खानचे उदाहरण दिले. तो म्हणाला, “केकेआर ही एक उत्तम फ्रँचायझी आहे, खान साहेबांचे चाहते मोठ्या संख्येने आहेत. ‘हॅट्स ऑफ द मॅन’, क्रिकेटच्या बाबतीत तो अजिबात हस्तक्षेप करत नाही. त्यांची ड्रेसिंग रूम खूपच सुरक्षित दिसते. एक चांगला मार्गदर्शक हेच करतो, तो जिथे जातो तिथे सर्वांना समान महत्त्व देतो आणि संघ एक युनिट म्हणून खेळेल याची खात्री करतो. आनंदी राहणारा संघ अधिक यशस्वी होतो.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button