क्रिडाताज्या घडामोडीमुंबई

विनोद कांबळी एकेकाळी करोडोंचा मालक, सध्याची अवस्था दयनीय

विनोद कांबळीचा सध्याचा घर खर्च कसा चालतो...

मुंबई : विनोद कांबळीची अवस्था सर्वांनीच पाहिली आहे. एकेकाळी करोडपती असणाऱ्या विनोदची दयनीय अवस्था झाली आहे. विनोदची एवढी हलाकीची परिस्थिती असेल तर त्याचं घर चालतं तरी कसं, हा सोपा प्रश्न सर्वांसाठीच कळीचा मुद्दा आहे. कारण विनोद कोणतेही काम करत नाही. पण विनोदचे घर आता कोणाच्या पैशांवर चालतं, हे आता समोर आले आहे.

विनोद कांबळी बनला होता करोडपती…
विनोद कांबळीने १९९१ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पण केल्यावर विनोद कांबळी हा लगेचच प्रकाशझोतात आला. विनोदने फार कमी वेळात जास्त यश मिळवले. त्यामुळे विनोदला जाहीरातीही त्यावेळी मिळायला लागल्या होत्या. त्यामुळे विनोद कांबळी त्यावेळी फार कमी दिवसांत करोडपती झाला होता. विनोद जेव्हा क्रिकेट खेळत होता तेव्हा त्याची संपत्ती ही १.५ मिलियन डॉलर एवढी होती.

व्यसनापायी झाला राजाचा रंक…
विनोद कांबळी एकेकाळी करोडपती होता. त्याने लग्न केलं. धर्म बदलला. फॅशन करायला लागला. पण क्रिकेटवरचं लक्ष उडालं. मैदानात अपयशी ठरायला लागला. व्यसनांनी त्याला घेरलं. त्यामुळे विनोद भारतीय संघाबाहेर पडला. प्रथम श्रेणी क्रिकेटही त्याने बंद केलं. त्यामुळे पैशांचा ओघ आटला. एकेकाळी करोडपती असलेल्या विनोदकडे २०२२ साली फक्त चार लाख रुपये होते. सध्याच्या घडीला तर त्याची अवस्था बिकट आहे.

विनोद कांबळीचा सध्याचा घर खर्च कसा चालतो…
विनोद कांबळी सध्याच्या घडीला काहीच करत नाही. त्याला चालताही येत नसल्याचं समोर आले आहे. जी संपत्ती होती ती सर्व विनोदने गमावली आहे. आता त्याच्याकडे काहीच संपत्ती शिल्लक नाही. पण बीसीसीआयने जी काही चांगली कामं केली आहेत, त्यावर विनोद कांबळीचा सध्याच्या घर खर्च चालत आहे. कारण बीसीसीआयने भारताच्या माजी खेळाडूंना पेंशन सुरु केली आहे.

विनोद कांबळीला दर महिन्याला किती पैसे मिळतात…
बीसीसीआयने माजी खेळाडूंच्या पेंशनसाठी काही नियम बनवले आहेत. या नियमांची पूर्तता विनोद कांबळीने केलेली आहे. त्यामुळे विनोद कांबळीला बीसीसीआयचे पेंशन लागू झाले आहे. सध्याच्या घडीला विनोद कांबळीला बीसीसीआयकडून दर महिन्याला ३० हजार एवढे पेंशन मिळत आहे आणि त्यावरच त्याचा सर्व घर खर्च चालत असल्याचे समोर येत आहे.

विनोद कांबळीला त्याचे काही मित्र मदत करत असल्याचेही समोर येत आहे. या मित्रांमुळेच विनोद कांबळीवर सर्व उपचार होत आहेत. कारण विनोदचे मित्र त्याच्या उपचारांचा खर्च उचलत असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला बीसीसीआयची पेंशन, एवढीच विनोद कांबळीची मिळकत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button