Tokyo Paralympics: निशाद कुमारची उंच उडीत रौप्य पदकाला गवसणी
![Tokyo Paralympics: Nishad Kumar wins silver in high jump](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Nishad_Kumar1.jpg)
टोकियो – टोकियो पॅरालंपिकमध्ये दिवसभरात विविध खेळ प्रकारात भारताच्या खेळाडूंनी आपलं कौशल्यपणाला लावलं पण एकूणच आशा-निराशेचं वातावरण राहिलं. दरम्यान, निशादकुमारनं पुरुषांच्या उंच उडीत रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात दुसरं पदक जमा झालं आहे. या स्पर्धेचं सुवर्ण पदक अमेरिकेच्या रोडरिक टाउनसेंड यानं जिंकलं.
पुरुषांच्या लांब उडी टी-४७ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निषाद कुमारने २.०६ मीटर उडी घेत रौप्य पदक आपल्या नावावर केलं. त्याचबरोबर त्यानं आशियाई स्पर्धेतही लांब उडीमध्ये विक्रम नोंदवला होता. निशादने कमावलेल्या या रौप्य पदाकासह भारताच्या पारड्यात दुसरं पदक जमा झालं आहे. निशादनं २.०२ मीटरची उडी घेत पदकाची आशा जागवली होती.
या स्पर्धेचं सुवर्ण पदक अमेरिकेच्या रोडरिक टाउनसेंड यानं जिंकलं. २.१५ मीटर लांब उडी घेत तो पहिल्या क्रमांकावर राहिला. तर तिसऱ्या स्थानी अमेरिकेच्याच विसे डलास यानं स्थान मिळवलं. त्यानं २.०६ मीटर उंच उडी घेतली. त्याचबरोबर भारताच्या राम पालनं पहिल्या प्रयत्नात १.९८ मीटर उडी घेऊ शकला नाही. तीनही प्रयत्नात तो ही उडी घेण्यात अपयशी ठरला. दुसऱ्या प्रयत्नात राम पालने १.९४ मीटर उडी घेतली. हा त्याचा वैयक्तिक बेस्ट स्कोअर राहिला. तो पाचव्या स्थानावर राहिला.
अंतिम सामन्यात भाविनाचा पराभव
टोकियो पॅरालंपिकमध्ये महिला टेबल टेनिसच्या ४ थ्या फायनलमध्ये भारताच्या भाविना पटेल हिला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात तिला चीनची खेळाडू झोऊ यिंग हिनं सरळ सेटमध्ये ३-० ने हारवलं. झोऊ यिंग पॅरालंपिक खेळात तिसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकण्यात यशस्वी ठरली. यापूर्वी तीनं सन २००८ आणि सन २०१२ मध्ये पॅरालंपिक खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं.