Tokiyo Olympic: बजरंग पुनियाचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले; उपांत्य फेरीत पराभव
![Tokiyo Olympic: Bajrang Punia's dream of a gold medal shattered; Defeat in the semifinals](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/768-512-.jpg)
टोकियो – भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाचा 65 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पराभव झाला. अजरबैजानचा कुस्तीपटू हाजी अलीयेव याने बजरंगला नमवले. या पराभवासह बजरंगचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. त्याला कास्य पदकासाठी सामना खेळण्याची संधी मिळू शकते.
अजरबैजानच्या कुस्तीपटू हाजी याने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखलं. त्याने पहिल्या सत्रात दोन वेळा 2-2 गुण घेत सामन्यात 4-1 ने आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात त्याने अधिक ताकतीने खेळ केला. त्याने बजरंगला पुनरागमनाची संधीच दिलीच नाही. त्याने 2, 2, 1, 2, 1 असे गुण घेतले. तर बजरंगला 2, 2 गुण घेता आले. बजरंगचा या सामन्यात 12-5 असा एकतर्फा पराभव झाला.दरम्यान, अजरबैजानचा कुस्तीपटू हाजी अलीयेव जर अंतिम फेरीत पोहोचला तर बजरंग पुनिया रेपेचाज राउंडमध्ये कांस्य पदकासाठी सामना खेळण्याची संधी मिळू शकते. बजरंग पुनिया भारताचा स्टार कुस्तीपटू आहे. त्याच्याकडून भारताला पदकाच्या आशा आहेत.