WPL 2024 | अवघ्या दोन दिवसांत WPL स्पर्धा होणार सुरु! जाणून घ्या संपूर्ण माहिती
WPL 2024 | वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेसाठी सर्व ५ संघ सज्ज झाले आहेत. या स्पर्धेची सुरुवात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. या दोन्ही संघांनी गेल्या हंगामात स्पर्धेची फायनल गाठली होती. आता दोघेही स्पर्धेचा सलामीचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने भारतातील २ शहरांमध्ये रंगणार आहे. तर आपण जाणून घेऊयात स्पर्धेबद्दल सर्वकाही…
WPL स्पर्धेला केव्हा सुरुवात होणार?
२३ फेब्रुवारीपासून सुरवात होणार आहे.
किती वाजता सुरु होणार सामना?
भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे.
हेही वाचा – ‘जरांगेंना अक्कल नाही, लोकांची फसवणूक करतो’; अजय महाराज बारसकरांचे सनसनाटी आरोप
स्पर्धेतील पहिला सामना या २ संघांमध्ये रंगणार?
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार पहिला सामना.
कुठे रंगणार पहिला सामना?
वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील पहिला सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर रंगणार आहे.
कुठे पाहता येईल लाईव्ह स्ट्रिमिंग?
टीव्हीवर स्पोर्ट्स १८ सह कलर्स सिनेप्लेक्सवर लाईव्ह पाहता येणार.
मोबाईलवर कुठे पाहता येतील सामने?
जियो सिनेमा ॲप आणि वेबसाईटवर फ्रीमध्ये पाहू शकता.