टी-२० महामुकाबला! भारत आणि दक्षिण आफ्रिकेत तगडी लढत, जाणून घ्या सर्व माहिती
भारतीय संघ जेतेपदाची ११ वर्षांची प्रतीक्षा संपवणार?
![The final match of T20 World Cup 2024 will be played between India and South Africa](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/IND-vs-SA-Final-780x470.jpg)
INDvsSA | टी-२० विश्वचषक २०२४ मधील अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार आहे. आज शनिवारी हा सामना होणार आहे. बार्बाडोसमध्ये हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ११ वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रथमच आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका सामना ब्रिजटाऊनच्या केन्सिंग्टन ओव्हलवर खेळवला जाणार आहे. ही खेळपट्टी गोलंदाज तसेच फलंदाजासाठीही उपयुक्त आहे. या मैदानावर धावांचा पाठलाग करणे सोपं नाही. अंतिम सामन्यात प्रथम खेळणाऱ्या संघाने १७५ पेक्षा अधिक धावसंख्या उभारली, तर ही विजयी धावसंख्या असून शकते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानी या ठिकाणी खेळवलेल्या चार सामन्यांपैकी तीन जिंकले आहेत. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
हेही वाचा – राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार; मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत घोषणा
हवामान अंदाज
बार्बाडोसमध्ये २९ जून रोजी दिवसभर पावसाची शक्यता आहे. सामन्याच्या दिवशी हवामान स्थितीत बदल झालेला आपल्याला या स्पर्धेत पाहायला मिळालं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्यादिवशी पाऊस पडल्यास ३० जून हा रिजर्व डे ठेवण्यात आला आहे. यासह राखीव दिवशीही पाऊस पडला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.
भारतीय संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन :
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिका संघाची प्लेईंग इलेव्हन :
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन माक्ररम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्किया, ओटनील बार्टमन.