breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

..तर आयपीएलचा फायनल सामना सुपर ओव्हर खेळवला जाणार

IPL 2023 : आयपीएल २०२३ च्या हंगामाचा विजेता कोण हे आज ठरणार आहे. काल पावसाच्या सरी सतत सुरू राहिल्याने हा सामना आज २९ मे रोजी खेळवला जाणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघात महामुकाबला खेळला जाणार आहे.

आजही महाअंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्यास साखळी सामन्यानंतर आयपीएल गुणतालिकेतील पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या संघआला महाविजेता म्हणून घोषित केलं जाईल. आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये सध्या गुजरात टायटन्स संघ अव्वल आहे. त्यामुळे सोमवारी अंतिम सामना न झाल्यास चेन्नई सुपर किंग्ज संघाला याचं नुकसान सहन करावं लागेल. यामुळे गुजरात टायटन्स आयपीएल २०२३ चा विजेता ठरेल, कारण चेन्नई पॉईंट्स टेबलवर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – ‘चित्रपट बनविण्यामध्ये टेक्निकल व्यक्तींचा महत्वाचा वाटा’; आकाश खुराना यांचे प्रतिपादन

रात्री ९.३० पर्यंत सामना सुरू झाला तर षटकं कमी होणार नाहीत. प्रत्येक ५-५ षटकांच्या सामन्यासाठी कटऑफ टाईम ११.५६ आहे. तेवढाही खेळ होऊ शकला नाही तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. जो संघ सुपर ओव्हर जिंकेल तो विजयी होईल. पावसाने सुपर ओव्हरही होऊ शकली नाही तर प्राथमिक फेरीत अव्वल राहिलेल्या गुजरातला विजयी घोषित करण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button