‘भारतीय संघाने केली ‘ही’ मोठी चूक’; सुनील गावस्कर रोहित शर्मावर संतापले
![Sunil Gavaskar said that the Indian team has made a big mistake by not playing Ashwin](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/sunil-gavaskar-and-rohit-sharma-780x470.jpg)
WTC Final 2023 : ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने ४६९ धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद १५१ धावा केल्या आहेत. परंतु भारतीय संघ ३१८ धावांनी मागे आहे. दरम्यान, भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय संघावर संताप व्यक्त केला आहे.
सुनील गानस्कर म्हणाले की, भारतीय संघानं अश्विनला न खेळवून मोठी चूक केली आहे. तुम्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळत आहात आणि त्यात तुम्ही कसोटी क्रिकेटमधील पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूचा समावेश करत नाही. टीम इंडियाचा हा निर्णय माझ्या समजण्यापलिकडला आहे. मी उमेश यादव ऐवजी त्याला संघात स्थान दिलं असतं.
हेही वाचा – शरद पवारांना आलेल्या धमकीनंतर अजित पवार आक्रमक; म्हणाले,..
२००१ मध्ये जेव्हा राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी एवढी मोठी भागीदारी केली, तेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी काय पाहिले. माफ करा, मी तुम्हाला आठवण करून देत आहे. त्यांनी जवळपास दोन दिवस फलंदाजी केली. त्यानंतर भारताने शेवटच्या दिवशी विजयासाठी पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियाला आऊट केले. त्यानंतर भारताने शेवटची कसोटीही जिंकली. त्यामुळे मला वाटत नाही की, ऑस्ट्रेलिया फॉलोऑन देईल.
भारताची फलंदाजी चांगली आहे. त्यांनी काही चुका केल्या आहेत. भारताकडे क्षमता आहे. ते काही चेंडू सोडत होते. बोल्ड होत होते. ईडन गार्डन्सवर जे घडले तसे ते काही धावा काढू शकले असते. शेवटच्या दिवशी चेंडू वळेल तेव्हा रवींद्र जडेजा काही जादू करू शकतो. त्यामुळे भारताचा पहिले लक्ष्य २६९ धावा पार करणे आहे. तसेच आघाडी शक्य तितकी कमी करण्याचा प्रयत्न करतील, असंही सुनील गावस्कर म्हणाले.