breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेश

Paris Olympic 2024 | मनू भाकेरने इतिहास रचला, भारताच्या खात्यात दुसरं ऑलिम्पिक पदक

Paris Olympic 2024 | मनू भाकेर आणि सरबजोतच्या जोडीने १० मी मिक्स्ड एअर पिस्तुलच्या जोडीने १६-१० च्या फरकाने कांस्यपदक पटकावलं आहे. मनू भाकेरने भारताला सलग दुसरं पॅरिस ऑलिम्पिक २०२४चं पदक मिळवून दिलं आहे. मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. यापुर्वी मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. तर आता ती एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी भारताची पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

भारतीय संघाने पहिला सेट गमावला पण दुसऱ्या सेट पासून सातत्याने आघाडी मिळवली. भारतीय संघ ४ शॉट्सनंतर सातत्याने ६-२ च्या फरकाने पुढे होता. यानंतर कोरियाने एक सेट जिंकला. मनु भाकेर सुरूवातीपासूनच लक्ष केंद्रित करून खेळत होती. सरब पिछाडीवर पडल्यास मनू शानदार नेम साधायची आणि मनू मागे पडल्यास सरब शानदार नेम साधायचा. अशारितीने भारतीय जोडीने जबरदस्त कामगिरी करत हे पदक जिंकलं आहे. स्वतंत्र भारताला एकाच ऑलिम्पिकमध्ये २ पदकं जिंकून देणारी मनू भाकेर पहिला खेळाडू ठरली आहे.

हेही वाचा     –     अजित पवार अमित शाहांना चोरून का भेटत होते? सुप्रिया सुळेंचा सवाल

पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी एकाच ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कोणत्याही पुरुष किंवा महिला खेळाडूने २ पदके जिंकलेली नाहीत. याशिवाय २ पदके जिंकणारी ती पहिली भारतीय नेमबाज ठरली. याआधी पॅरिस ऑलम्पिकच्या दुसऱ्या दिवशी मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक पटकावले होते. मनू भाकेर गेल्या २० वर्षांत वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक अंतिम फेरीत पोहोचणारी भारताची पहिली महिला नेमबाज ठरली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button