सातारा: भुईजला विजयादशमीनिमित्त राज्यस्तरीय कब्बडीचा थरार!
येत्या 21 ऑक्टोबरपासून जिल्हास्तरीय महिला स्पर्धा
सातारा: येथील ग्रामदैवत श्रीमहालक्षीदेवी यात्रेनिमित्त मित्र क्रीडा मंडळाच्यावतीने व भगऋषी क्रीडा मंडळाच्या सहकार्याने पुरुष गटाच्या राज्यस्तरीय व महिलांच्या जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धांचे आयोजन केल्याची माहिती मंडळांच्या आयोजकांनी दिली आहे.
या स्पर्धा शनिवार ता. 21 ऑक्टोबर पासून सुरु होणार असून त्यात महिला तसेच पुरुषांच्या 55 किलो वजनी गट व 70 किलो वजनी गटात खेळविल्या जाणार आहेत. महिलांचे सामने या साखळी पध्दतीने खेळविले जाणार आहेत पुरुषांचे सामाने बाद फेरीने खेळविले जातील. महिलांसाठी रुपये दहा हजार 1 प्रथम क्रमांक, रुपये सात हजार 1 व्दितीय क्रंमाक रुपये पाच हजार तृतीय क्रमांकासाठी महिला संघासाठी 500 रुपये प्रवेश ठेवण्यात आली आहे. तर पुरुष 55 किलो गटासाठी प्रथम क्रमांक रुपये 21 हजार एक व कायम चषक, व्दितीय क्रमांकासाठी 15 हजार एक व कायम चषक, तृतीय क्रमांकासाठी 10 हजार एक व कायम चषक, आदर्श व शिस्तबध्द संघ रुपये 5 हजार 555, विजय बजरंग ननावरे यांच्याकडून, उत्कृष्ठ चढाई रु 2001 नितिन गणपत भोसले यांच्याकडून, उत्कृष्ठ पकड़ रु 2001 हरिभाऊ माधवराव भोसले यांच्याकडून, या गटात सेमी फायनला येणा-या 4 संघाना साखळी पध्दतीने खेळवले जाईल. हे सामने 22.10.2023 रोजी खेळवले जातील. या वजनी गटासाठी प्रवेश फी 700 रुपये ठेवण्यात आली आहे.
70 किलो गटासाठी प्रथम क्र. रु 41 हजार एक व कायम चषक, व्दितीय क्र. रु 31हजार एक व कायम चषक, तृतीय क्र.रु 21 हजार एक व कायम चषक, आदर्श व शिस्तबध्द संघ रु 5555 भरत पांडुरंग भोसले यांच्याकडून, उत्कृष्ठ चढाई रु.2001 उमेश लक्ष्मण जाधव यांच्याकडून, उकृष्ट पकड रु.2001 बिपीन जनार्दन जाधव यांच्याकडून, या गटातील सेमी फायनलला येणा-या 4 संघांना साखळी पध्दतीने खेलविले जाईल. या वजनी गटासाठी 1000 रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. भुईजपासून 25 किलोमीटर पुढील संघाची जेवणाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.इच्छुक संघाच्या व्यवस्थापकांनी चंद्रकांत निकम ९७६५५७६४०२,सचिन गायकवाड ९९६०९६७९९७ या क्रमांकावर संपर्क साधावा.