breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

भारताची फायनलमध्ये घडक; रोहित शर्माचे विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य; म्हणाला..

T20 World Cup | टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरु आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने तिसऱ्यांदा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता जेतेपदापासून टीम इंडिया फक्त एक विजय दूर आहे. याशिवाय भारताच्या विजयात कर्णधार रोहित शर्माचीही भूमिका महत्त्वाची होती. रोहित शर्माने उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर अनेक वक्तव्ये केली आहेत.

रोहित शर्मा म्हणाला, हा सामना जिंकल्याचं खूप समाधान आहे. आम्ही एक युनिट म्हणून खूप मेहनत घेतली. हा सामना जिंकण्यासाठी सर्वांनीच खूप प्रयत्न केले. आम्ही परिस्थितीशी खूप चांगले जुळवून घेतले. तेथील परिस्थितीशी जुळवून घेणं हे एक आव्हान होतं पण आम्ही या परिस्थितीशी जुळवून घेतलं आणि या टूर्नामेंटमधील विजयाचं हेच मोठं कारण आहे. गोलंदाज आणि फलंदाजांनी परिस्थितीशी जुळवून घेत कामगिरी केली तर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो, जसं की आज घडलं. आम्ही ज्याप्रकारे या सामन्यात विजय मिळवला ते पाहून मी खूप आनंद होतोय.

हेही वाचा     –      बीडमध्ये मनोज जरांगेंच्या मातोरी गावात तुफान दगडफेक, गावात तणावपूर्ण शांतता 

एका वेळी१४०-१५० धावा पुरेशा वाटत होत्या, पण जसजसा खेळ पुढे सरकत गेला आणि ज्याप्रमाणे मी आणि सूर्याची भागीदारी पाहता आम्ही आणखी २५ धावा केल्या पाहिजेत असं मला वाटलं. मी माझ्या मनात लक्ष्य निश्चित केलं होतं, परंतु मला त्याबद्दल कोणालाही सांगायचे नव्हते कारण ते सगळे सहजतेने खेळणारे फलंदाज आहेत आणि त्यांना मैदानात जाऊन कोणताही दबाव न घेता मुक्तपणे फलंदाजी करावी असे वाटत होते. आम्ही परिस्थिती समजून घेत चांगली फलंदाजी केली आणि त्याचा निकाल समोर होता आम्ही १७० धावा केल्या. या खेळपट्टीवर १७० हा खूप चांगला स्कोअर आहे असं माझं मत होतं आणि गोलंदाज तर कमाल होते, असं रोहित शर्मा म्हणाला.

अक्षर आणि कुलदीपच्या गोलंदाजीबाबत रोहित शर्मा म्हणाला की, ते उत्कृष्ट फिरकीपटू आहेत. काही फटके खेळणे अवघड आहे, कुलदीप-अक्षरवरही दडपण होते की अचूक गोलंदाजी कशी करायची, पण ते शांत राहिले आणि त्यांना काय गोलंदाजी करायची हे माहीत होते. आम्ही पहिल्या डावानंतर चर्चा केली तेव्हा ठरलं की शक्य तितकं स्टंप्सवर सर्वाधिक मारा करत राहा.

विराट कोहलीबाबत रोहित शर्मा म्हणाला की, कोहली एक उत्कृष्ट खेळाडू आहे. कोणताही खेळाडू खराब फॉर्ममधून जाऊ शकतो. त्याची खेळण्याची पध्दत आणि अशा मोठ्या सामन्यांमधील त्यांचे महत्त्व आम्हाला माहित आहे. १५ वर्ष खेळलेल्या खेळाडूसाठी फॉर्म हा चिंतेचा विषय नाही. त्याने सर्वोत्तम खेळी फायनलसाठी राखून ठेवली असावी.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button