breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापुर्वी भारतीय संघाला मोठा धक्क! रोहित शर्माला सराव सत्रात दुखापत

INDvsPAK | टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील भारतीय संघ आपला दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहितला दुखापत झाली होती. जोशुआ लिटलचा वेगवान चेंडू रोहितच्या उजव्या हाताला लागला होता. यानंतर रोहितने ‘रिटायर्ड हर्ट’ होण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा एकदा रोहित शर्मा दुखापत झाली आहे. त्यामुळे रोहित पाकिस्तानविरूद्धचा समाना खेळणार की नाही? याबाबत साशंका आहे.

रोहित शर्माच्या अंगठ्याला आता दुखापत झाली आहे. भारतीय कर्णधाराला नेटमध्ये ही दुखापत झाली. तो नेटमध्ये श्रीलंकेच्या थ्रोडाउन स्पेशालिस्ट नुवानविरुद्ध सराव करत असताना चेंडू विचित्रपणे उसळला आणि त्याच्या हाताला लागला. रोहित वेदनेने ओरडताना दिसला. यानंतर फिजिओने लगेच येऊन तपासणी केली. यानंतर रोहितने काही काळ दुसऱ्या टोकाकडून फलंदाजी केली आणि नंतर नेटच्या बाहेर गेला. त्यानंतर कर्णधार पूर्णपणे बरा झाला आणि त्याने पुन्हा सराव सुरू केला. त्यामुळे तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा     –      केंद्रातील शपथविधीपूर्वी सोन्याच्या किमती झाल्या कमी; जाणून घ्या आजचे दर 

रोहित शर्माच्या दुखापतीबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अपडेट दिलेली नाही. भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना खूप महत्त्वाचा आहे. हा सामना न्यूयॉर्क विरुद्ध नासाऊ काउंटी स्टेडियमवर होणार आहे. खेळपट्टी पूर्णपणे गोलंदाजांना अनुकूल होणार आहे. अशा परिस्थितीत संघाला रोहित शर्मासारख्या अनुभवी फलंदाजाची गरज आहे, जो अशी परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकेल.

टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

टी-२० वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान संघ :

बाबर आजम (कर्णधार), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सईम अयूब, शादाब खान, शाहीन शाह अफरीदी आणि उस्मान खान.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button