IPL 2024 Auction : पॅट कमिन्स ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
![Pat Cummins became the most expensive player in IPL history](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Pat-Cummins-780x470.jpg)
IPL 2024 Auction : ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्सवर आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासाती सर्वाधिक बोली लागली आहे. सनरायझऱ्स हैदराबादनं पॅट कमिन्सला तब्बल २० कोटी ५० लाख रूपयांची विक्रमी बोली लावली आहे. यापूर्वी, पंजाबने सॅम करनावर १८ कोटींची बोली लावली होती.
ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्सची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. चेन्नई सुपर किंग्जने कमिन्सवर पहिली बोली लावली. यानंतर मुंबई इंडियन्सने बोली लावायला सुरुवात केली. या दोघांमध्ये ४.८० कोटी रुपयांपर्यंत बोली लागली. यानंतर आरसीबी खेळात आला. चेन्नई ७.६० कोटी रुपयांपर्यंत बोलीत राहिले. यानंतर सनरायझर्स हैदराबादने स्पर्धा सुरू केली. शेवटी सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली. हैदराबादने त्याला २०.५० कोटी रुपयांना खरेदी केले.
हेही वाचा – लोकसभेतून खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंचं निलंबन; सुप्रिया सुळे म्हणाल्या..
THE BIGGEST IPL BID EVER 😱
HISTORY CREATED here at the #IPLAuction
Australia's World Cup winning captain Pat Cummins is SOLD to @SunRisers for a HISTORIC INR 20.5 Crore 💰💰💰💰#IPL pic.twitter.com/bpHJjfKwED
— IndianPremierLeague (@IPL) December 19, 2023
दरम्यान, वनिंदू हसरंगाला हैदराबादने १ कोटी ५० लाख रूपयांना खरेदी केलं आहे. चेन्नईने डॉरिल मिशेलला १४ कोटी, रचिन रवींद्रला १.८ कोटी, शार्दुल ठाकूरला ४ कोटी रूपयांना खरेदी केलं आहे. मुंबई इंडिन्सने जेराल्ड कोएत्झीला ५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. पंजाब किंग्सने हर्षल पटेलला ११.७५ कोटी, ख्रिस वोक्सला ४.२० कोटी रूपयांना खरेदी केलं आहे.