क्रिडाताज्या घडामोडी

नीरज चोप्राने भालाफेकीत ९० मीटरचे अंतर अखेर गाठले

तिसरा आशियाई खेळाडू, देशासाठी नवा विक्रम प्रस्थापित

मुंबई : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने दोहा डायमंड लीगमध्ये अभिमानास्पद कामगिरी केली. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजला ९० मीटर लांबचं अंतर गाठता आले नव्हते आणि त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर नीरज खचला नाही आणि जोमाने पुन्हा तयारीला लागला. त्याचे फळ मिळताना दिसले. आज डायमंड लीगमधील तिसऱ्या प्रयत्नात त्याने ९०.२३ मीटर लांब भाला फेकला.

लेफ्टनंट कर्नल नीरज चोप्राने ऑलिम्पिक , जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई खेळांमध्ये दुहेरी पदक विजेते आहेत. त्याने एकदा डायमंड लीग जिंकली आहे. चोप्राने २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि असे करणारा तो पहिले आशियाई भालाफेकपटू बनला होता. २०२३ मध्ये विजय मिळवल्यानंतर तो जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणारा पहिला आशियाई खेळाडू ठरला होता. २०१६ मध्ये २० वर्षांखालील जागतिक चॅम्पियनशिपमधील त्याचा ज्युनियर भालाफेकीचा जागतिक विक्रम कायम ठेवला आहे.

हेही वाचा –  ७ जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होणार! यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

२०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज ८९.४५ मीटरपर्यंत भाला फेकू शकला होता, परंतु पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर भाला फेक करून सुवर्णपदक जिंकले. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने ८८.५४ मीटरसह कांस्यपदक जिंकले. आज त्याने ९०.२३ मीटर भालाफेक केला… ९० मीटरचे अंतर पार करणारा तो तिसरा आशियाई खेळाडू ठरला. यापूर्वी अर्शद ( ९२.९७ मी.) आणि तैवानचाय चाओ-टीसून चेंग ( ९१.३६ मी.) यांनी हा पराक्रम केला आहे.

नीरजने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात ८८.४४ मीटर लांब भाला फेकला आणि आघाडी घेतली. शिवाय त्याने पहिल्याच प्रयत्नात वर्ल्ड लीड घेतली. त्यानंतर अँडरसन पीटर्सने ८५.६४ मीटर व ज्युलियन वेबरने ८३.८२ मीटर अंतर कापले. भारताच्या किशोर जेनाने दुसऱ्या प्रयत्नात ७८.६० मीटर लांब भाला फेक केली.

त्यानंतर नीरजने त्याच्या तिसऱ्या प्रयत्नात ९०.२३ मीटर भाला फेक केली. त्याने प्रथमच ९० मीटरचे अंतर पार केले आणि स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला. त्याने २०२२च्या स्टॉखोम डायमंड लीगमध्ये ८९.९४ मीटर अंतर पार करून राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. ज्युलियन वेबरने त्याच्या शेवटच्या प्रयत्नात ९१.०६ मीटर लांब भालाफेक करून अव्वल स्थान पटकावले आणि नीरजकडून टायटल हिसकावले. ज्युलियननेही प्रथमच ९०मीटरचे अंतर कापले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button